महापालिका निवडणुकीच बिगुल कधी वाजणार? महायुतीच्या मंत्र्यांन तारीखच सांगितली

पुणे : राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणूकांच्या हालचालींना आता वेग आला असून राज्य निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आला आहे.अशातच आता राज्याचे परिवहन मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी महापालिका निवडणुकीविषयी मोठे भाष्य केले आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता साधारणपणे 15 ते 20 जानेवारी दरम्यान लागण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर त्यापुढे फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढे म्हटले की, शक्य झाल्यास १५ ते २० डिसेंबर या दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागू शकते. तर, १५ ते २० जानेवारी दरम्यान महापालिकांसाठी निवडणुका पार पाडतील असा अंदाज सरनाईकांनी व्यक्त केला आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. निवडणुका तोंडावर आल्यावर विकास करत नाही. ३६५ दिवस आम्ही मैदानात असतो. सर्वसामान्य जनतेपर्यंत २४ तास पोहोचण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे अनुयायी करत आहेत. निवडणुकी आज किंवा उद्या लागल्या किंवा आज लागल्या आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसैनिक 365 दिवस निवडणुकीला सामोरे जायला सज्ज असतो असेही सरनाईकांनी म्हटले.

मनसे नेते अविनाश जाधव यांनी या निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटप केल्याचा आरोप केला. त्यावर सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये तीनच नेते फिरत होते.देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधून दहा दिवसात 53 सभा घेतल्या हा इतिहास आहे. कोणीही वल्गना करू नये. त्यांना जर बोलायचं असेल तर त्याच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी कोण उतरलं असा सवाल प्रताप सरनाईक यांनी विचारला आहे.

