गौरी गर्जे प्रकरणात महत्वाची अपडेट ; ‘पोलिसांसोबत गेलेल्या व्यक्तीने पुरावे मिटवले’, आम आदमी पार्टीच कनेक्शन,कोणी केला दावा?

पुणे : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी गर्जे पालवे मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.ज्यावेळी गौरीच्या मृत्यूची बातमी समोर आली, तेव्हा पोलिसांसोबत घटनास्थळी दाखल झालेल्या एका व्यक्तीने घरातील पुरावे नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणामागे नेमका कोणाचा हात आहे हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी गर्जे पालवे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी इथं आपल्या राहत्या घराच आयुष्याचा शेवट केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पती अनंत गर्जेला अटक केली होती. मागील काही दिवसांपासून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. आता या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे.गौरी गर्जेच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर जेव्हा पोलीस आणि डॉक्टरांची गौरी गर्जे यांच्या घरी वरळीला गेली. तेव्हा त्या टीम सोबत एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव सुभाष काकडे असून तो आम आदमी पार्टीचा पदाधिकारी आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. पोलिसांकडून, डॉक्टरांकडून जेव्हा घरामध्ये तपास सुरू होता. तेव्हा सुभाष काकडे पुरावे नष्ट करण्यासाठी आत होता का? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. दमानिया यांच्या आरोपानंतर आता गौरीच्या घरात तपास सुरू असतानाचा एक व्हिडीओ देखील समोर आला असून तो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दरम्यान या व्हिडीओत एक निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेली व्यक्ती पोलिसांच्या टीमसोबत गौरी गर्जेच्या घरात घुटमळत असल्याचं दिसून आलं आहे. आता ही व्यक्ती नक्की कोण? पोलिसांनी त्याला घरात प्रवेश कसा काय दिला? याचा या प्रकरणाशी नक्की संबंध काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
