पुन्हा निवडणूकीची रणधुमाळी! निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक, महापालिकेची निवडणूक जाहीर होणार?

मुंबई : राज्यात नुकत्याच नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. याचा निकाल 21 तारखेला जाहीर करण्यात येणार आहे. असे असताना आता राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाने गुरुवारी सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलाविली आहे.

यामध्ये मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालयाने ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्याच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आयोगास दिले आहेत. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

निवडणुका झाल्या तर विदर्भ आणि मराठवाड्यातील बहतांश जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार नाहीत. अशा परिस्थितीत ओबीसी समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागेल याची भाजपला भीती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाजूला ठेवून आधी महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मतदार याद्या दुरुस्त करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार पालिकांनी किती प्रमाणात मतदार याद्या दुरुस्त केल्या आहेत. तसेच पालिका निवडणुकांची तयारी कुठवर आली आहे याचा आढावा घेण्यासाठी निवडूक आयोगाने सर्व पालिका आय़ुक्तांची बैठक बोलावली आहे.
