राजकारणात खळबळ! फुरसुंगी नगरपरिषदेच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी, माघार घ्या, नाहीतर संतोष देशमुख करू….


पुणे : राज्यात आज अनेक ठिकाणी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. असे असताना फुरसुंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार यशवंत अरुण बनसोडे यांना अज्ञात व्यक्तीने कार अडवून जीवघेणी धमकी दिली.

यामुळे एकच खळबळ उडाली. सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान सासवड रोड रेल्वे स्टेशन परिसरातून बनसोडे कारने जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे वाहन थांबवले. त्या व्यक्तीने निवडणुकीतून माघार घेण्यास जबरदस्ती करत धमकी दिली. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच जर माघार घेतली नाही तर तुमचा संतोष देशमुख करू, असे म्हणत त्याने धमकी दिली. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 352(3) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3) सह 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या व्यक्तीच्या कमरेला लोखंडी शस्त्र लपवलेले दिसले. याच परिसरात रेल्वे पटरीजवळ दुसरा अनोळखी व्यक्ती उभा असल्याचेही बनसोडे यांनी पाहिले.

       

या घटनेनंतर घाबरलेल्या बनसोडे यांनी त्वरित पोलिसांकडे धाव घेतली. याबाबत सध्या पोलिस उपनिरीक्षक महेश नलवडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक सध्या स्थगित केली आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच धमकी देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Jiया प्रकरणाचा राजकीय वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याठिकाणी नगराध्यक्ष, सदस्य आणि इतर सर्व पदांसाठीची प्रक्रिया थांबवण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया 4 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. असे असताना याठिकाणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!