ब्रेकिंग! गौरी गर्जे प्रकरणात महत्वाची अपडेट ; पती अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा धक्कादायक जबाब, गर्भपाताच्या रिपोर्ट..

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी मुबंईतील राहत्या घरात आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसींचा जबाब पोलिसांनीं नोंदवला आहे. या प्रकरणात आता आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय आहे प्रकरण?
अनंत गर्जे आणि गौरीचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यातच गौरीने आत्महत्या केली. गौरीला घराच्या शिफ्टींगच्या वेळी काही पेपर सापडले होते. त्यामध्ये एका महिलेचा उल्लेख होता. ही महिला अनंत गर्जेची जुनी प्रेयसी असल्याचे म्हटले जाते. तसेच तिच्या गर्भपाताच्या पेपरवर नवऱ्याचे नाव अनंत गर्जे असे होते. आता या प्रकरणात अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीने वरळी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. २०२२ पासून माझा आणि अनंतचा काहीही सबंध नाही. गौरीला घरी सापडलेल्या कागदपत्रांबद्दल मला काहीही कल्पना नाही असे जुन्या प्रेयसीने म्हटले आहे.

दरम्यान गौरीने आत्महत्या केल्यानंतर अनंत फ्लॅटच्या खिडकीतून आतमध्ये गेला होता. त्यावेळी त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आता जुन्या प्रेयसीने दिलेल्या जबाबानंतरया प्रकरणात अनंत गर्जेची मानसिक तपासणी देखील होणार आहे. पोलीस वैज्ञानिक तज्ञांच्या माध्यमातून तपास करणार आहेत. अनंत गरजेची पॉलीग्राफ टेस्ट करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. तसेच आरोपी अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

