राज्याच्या राजकारणात खळबळ! धनंजय मुंडेंचा इंदौरमध्ये मर्डर….आमदाराने केला मोठा गौप्यस्फोट

इंदोर : अजित पवार गटाचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे मागील काही काळापासून सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. आता त्यांच्याबाबत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
धनंजय मुंडेंचा इंदोर येथील एका हॉटेलमध्ये मर्डर होणार होता. मात्र त्यांना भय्यूजी महाराजांनी वाचवलं, असा गौप्यस्फोट रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. शिवाय धनंजय मुंडे कोणत्या हॉटेलमध्ये थांबले होते, याचीही माहिती आपल्याकडे आहे.
मात्र आपण ती माहिती सार्वजनिक करणार नाही. पण तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा रत्नाकर गुट्टे यांनी दिला आहे. गुट्टे यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेंवर जहरी टीका केली आहे. “धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं, तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे. पण मी हे सगळेच आता काढणार नाही. तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे.

तुम्ही मला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली, हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे, त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो, असं रत्नाकर गुट्टे म्हणाले.
