निकाल लांबणीवर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?


पुणे : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. निवडणुका या पारदर्शी होणे महत्त्वाचे आहे त्यामुळे आजची निवडणूक होईल पण निकाल हा 20 तारखेच्या निवडणुकीनंतरच होईल असं कोर्टाने सांगितलं आहे.यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.’नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल अजून मी वाचलेला नाही. मागची 25-30 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, हे असं पहिल्यांदा घडतंय, घोषित झालेल्या निवडणुका, निकाल पुढे जात आहे. मला ही सगळी पद्धत फार योग्य वाटत नाही. खंडपीठ स्वायत्त आहे. त्यांचा निकाल मान्य करावा लागेल असंही त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘इलेक्शन कमिशन सुद्धा स्वायत्त आहे. जे उमेदवार मेहनत करतात, प्रचार करतात त्यांचा भ्रमनिरास होतो. व्यवस्थेच्या फेल्युरमुळे काही चुकीचं नसताना अशा गोष्टी होणं योग्य नाही. पुढे अजून खूप निवडणुका निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत. पुढच्या निवडणूक प्रक्रियेसाठी आयोगाने सुधार केला पाहिजे. पुढच्या निवडणुकीत असं होणार नाही हे पाहिलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे..

दरम्यान नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 डिसेंबरला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयानं सांगितलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!