मोठी बातमी! नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल पुन्हा लांबणीवर, सर्व नगरपालिकांची मतमोजणी एकत्रच होणार; २१ डिसेंबरला लागणार निकाल, हायकोर्टाचा मोठा निर्णय..


मुंबई : नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकीविषयी नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्या मतमोजणी होणार नाही आणि निकाल २१डिसेंबर रोजी जाहीर होईल.

राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास २० नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक २० डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा२० नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल २१ तारखेला जाहीर करा.

तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही २० डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!