परप्रांतीय शिक्षकाडून एकास शिवीगाळ करत मारहाण, हाटकल्याचा राग मनात धरला अन्..; कुंजीरवाडी येथील घटना

लोणी काळभोर : घरासमोर लघवी करताना दिसला म्हणून त्याला हाटकल्याचा राग आल्याने एका परप्रांतीय शिक्षकाने शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व ठोस्याने मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवाजी कांतीलाल काळभोर (वय ४३, या. कुंजीरवाडी, थेऊरफाटा ता. हवेली) या शेतकऱ्यांने दिलेल्या फिर्यादीवरून आनंद मोहन कुलकर्णी (वय ३८, रा. घर नंबर ७९, सुहाग कॉलनी, विजापुर, कर्नाटक) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत थेऊर फाटा येथे घडली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी काळभोर हे २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारांस शेतातील गव्हाला पाणी देवुन राहते घरी आले त्यावेळी आनंद कुलकर्णी हे काळभोर यांच्या घरासमोर लघवी करताना दिसले. म्हणून त्यांनी त्याला हाटकले. याचा त्याला राग त्याला आल्याने तो त्यांना तु मला विचारणारा कोण? असे म्हणून उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला. ‘

व काळभोर यांना शिवीगाळ करून हाताने व ठोस्याने मारहाण करू लागला. त्यानंतर पाठीमागून त्याने जोराचा धक्का दिल्याने काळभोर खाली पडल्याने त्यांच्या कपाळाला, नाकाला, ओठाला मार लागुन रक्त स्त्राव होऊ लागला.

यामध्ये त्यांच्या तोंडातील वरील बाजूचा एक दात पडला असून डाव्या पायाच्या गुडघ्याला व उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस मदतीसाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस आले नंतर त्यांनी काळभोर व कुलकर्णी यांना पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर काळभोर यांना उपचारासाठी ससुन हॉस्पीटल पुणे या ठिकाणी पाठवले. उपचार झाले नंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस तक्रार दित आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी शिंदे हे करत आहेत.
