दुर्दैवी! उरुळीकांचनला दारुड्याच्या हल्ल्यातील जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू; अचानक झालेला हल्ला जीवावरच बेतला…

उरुळी कांचन : दुकानापुढे गोंधळ घालत बसत जावु नये असे म्हणल्याच्या कारणावरून उरुळी कांचन येथे एकाला शिवीगाळ दमदाटी करून दुकानदारावर चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हल्यातील जखमी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे.
रविवारी रात्री (ता. 30 ) रोजी रात्रीत्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
प्रभाकर नारायण तुपे (वय. 66 रा. तुपेवस्ती उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे ) यांचा या हल्यात मृत्यू झाला आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी स्वप्निल बाळु ओव्होळ (रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल करुन त्या बेवड्याला अटक आहे.

उरुळी कांचन गावचे हद्दीत तुपेक्स्ती येथे प्रिन्स जनरल स्टोअर्सच्या समोर आरोपी स्वप्निल बाळु ओव्होळ याने प्रभाकर तुपे यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे रविवार( दि. ३०) निधन झाले आहे.
