ब्रेकिंग! बारामती नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक, आता ‘या’ तारखेला होणार मतदान,कोर्टाचा महत्त्वाचा आदेश


पुणे: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज दुपारी पाच वाजता या निवडणुकांसाठीचा प्रचार संपुष्टात येणार असुन मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, अशातच आता निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची माहिती समोर आली आहे. आता बारामती, फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदान प्रक्रिया अनुक्रमे 20 आणि 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

बारामती मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारा विरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेचा निकाल सत्र न्यायालयाने दिला आणि याचिका फेटाळली. मात्र नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहेत त्याच्या अपीलची मुदत संपली नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.. दरम्यान बारामती नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र, ही प्रक्रिया पावणेतीन वाजताच बंद झाली होती. याशिवाय, उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या, यावर काहीजणांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने भाजपच्या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान निवडणुका तोंडावर असताना महाबळेश्वर आणि फलटणनंतर बारामतीची निवडणूक देखील पुढे गेली आहे.त्यानुसार बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता 20 डिसेंबर रोज पर्यंत पुढे ढकलली आहे. साहजिकच नगराध्यक्षपदाचाही यामध्ये समावेश असल्याने बारामतीचे नगरपरिषदेचे मतदान थेट 20 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह ज्या सात जागांसाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक आयोगाने तसे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा तर 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!