धक्कादायक! फ्रुटीतून गुंगीचे औषध देऊन कथित पत्रकाराने केला बलात्कार अन्…नंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली 3 लाखांची खंडणी, थेऊर येथे घडली घटना…


लोणी काळभोर : हातउसने दिलेले पैसे काढुन देतो असे सांगुन कथित पत्रकाराने महिलेला फ्रुटीमध्ये गुंगीकारक औषध पाजून तिला लॉजमध्ये घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरीक संभोग केला असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ४१ वर्षे वयाच्या विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हनुमंत राजकुमार सुरवसे (वय २९, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार ३ मे रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते ४ मे २०२५ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील वृदांवन लॉज येथे घडला आहे.

पिडीत महिला आपला मोठा मुलगा त्याची पत्नी व लहान मुलालासमवेत राहतात. गेले ३ महीन्यांपासुन त्या कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणुन नोकरी करीत आहेत. त्यापुर्वी त्यांनी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत नर्स म्हणुन नोकरी केलेली आहे. पिडीतेने कानिफ जगदाळे यांचे मार्फतीने एका इसमास २० हजार रुपये दिले होते. परंतु ते पैसे कानिफ जगदाळे याने वेळेवर न दिल्याने त्यांचेमध्ये वादविवाद होत असत.

फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्या तोंडओळखीचे इसम हनुमंत सुरवसे यांनी हॉस्पीटलमध्ये शिबीर आयोजित केलेले होते. त्या शिबीरामध्ये सुरवसे यांने शिबीरामध्ये काढलेले फोटो पाठविण्यासाठी माझा मोबाईल क्रमांक घेतला व शिबीरातील काढलेले सर्व फोटो तिचे मोबाईल क्रमांकाचे व्हॉटसअपवर पाठविले. त्यानंतर सुरवसे हा तिचेशी त्यांच्या मोबाईल वरुन बोलत होता. तसेच मेसेजदेखील करीत असायचा.

       

तसेच जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. तो नेहमी तिचेशी व्हॉटसअप कॉलवरच बोलत असायाचा. त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगितले होते. दोघांची चांगली ओळख झाल्याने तिने त्यास हातऊसने दिलेल्या रकमेसंदर्भात सांगितले होते. यावर त्याने, मी सदर रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले होते.

दिनांक ३ मे रोजी रात्रौ ९ वाजण्याच्या सुमारास उसने दिलेले पैसे काढुन देतो असे सांगुन फिर्यादीला त्याचे गाडीमध्ये बसवले. तिला फ्रुटी या शितपेयामध्ये काहीतरी गुंगीकारक औषध देऊन थेऊर येथील वृदांवन लॉज मध्ये घेऊन जाऊन तिचेवर जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. तसेच जबदरस्तीने तिचे कपडे काढुन त्याचे मोबाईलमध्ये विवस्त्र फोटो काढले व ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचेकडे ३ लाख रुपयाची मागणी करुन ३२ हजार रुपये घेतले आहेत. व उर्वरीत पैसे न दिल्याने फोटो व रेकॉर्डिंग व्हायरल करणार तसेच तु याबाबत कोणाला काही सांगीतले तर तुला आमच्या बायका आणून मारत पोलीस स्टेशन येथे घेऊन जाईल. अशी धमकी दिल्याने पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून हनुमंत सुरवसे यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव हे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!