प्रेमाच्या नादात रक्ताचा सडा, तरुणाची गोळ्या झाडून व दगडाने ठेचून केली हत्या, भयानक मर्डरने महाराष्ट्र हादरला…


नांदेड : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, दरोडा, विनयभंग, बलात्कारासारखी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे. प्रेमसंबंधातून वाद निर्माण झाल्याने एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या इतवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्षम तोटे या तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेत प्रथम त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला.

या दुहेरी हल्ल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळ पाहिले तेव्हा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही भयानक घटना नांदेड शहरातील मिलिंद नगर भागातील पैलवान टी हाऊसच्या पाठीमागे घडल्याचे समोर आले आहे.

       

माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान खून करणारे दोन्ही आरोपी मिळून आले असून पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास वेगाने उलगडण्याची शक्यता आहे.

मृत सक्षम तोटे आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते, अशी माहितीही पुढे आली आहे. मृत तरुण आणि आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे आरोपी पळ काढू शकले नाहीत. त्यांना बेड्या ठोकून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

दरम्यान, मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणामागे कोणते वैयक्तिक किंवा भावनिक कारणे दडलेली होती, याचा तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!