मोठी बातमी! राज्यात या ठिकाणी निवडणूक थांबवण्याचे आयोगाचे आदेश, कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ, नेमकं कारण काय?

नवी दिल्ली : राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काही प्रभागातील निवडणूक थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण मर्यादा ओलांडल्याविषयी फैसला येण्याची शक्यता आहे.
या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यासंदर्भात आज निकाल येण्याची शक्यता आहे. अनेक जण या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवत आहेत. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.
राज्यातील 3 प्रभागांमधील निवडणूक थांबवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस मात्र कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही.

काही प्रभागातील निवडणूक मात्र या निर्णयाने बाधीत झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक चिन्ह वाटप आणि प्रचारही अंतिम टप्प्यात आला आहे. पण या तीन ठिकाणी निवडणूक थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील दोन ठिकाणी निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार नितीन वाघमारे यांचा मृत्यू झाल्याने येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. याविषयीचे निवडणूक आयोगाचे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.
