मोठी बातमी! मेडिकल कॉलेजात ईडीची एन्ट्री, महाराष्ट्रासह ‘या’ 10 राज्यात एकाचवेळी छापेमारी, काय आहे प्रकरण?


पुणे :, वैद्यकीय महाविद्यालयांमधील कथित भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणी महाराष्ट्रासह 10 राज्यातील वैद्यकीय कॉलेजवर प्रवर्तन निदेशालय (ED) ने 15 ठिकाणी छापेमारी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रवर्तन निदेशालयाच्या अनेक टीम्सनी गुरूवारी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्यप्रदेश ,छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातील 15 ठिकाणी छापे टाकले. कथित भ्रष्टाचार आणि लाचखोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात आले, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे नियमन करणाऱ्या नियामक चौकटीत फेरफार करण्यात आल्याचा आरोप होता, त्यानतंर ही कारवाई झाली. सध्या ED ने 15 जागी छापे टाकले, ज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या सात कॅम्पस आणि एफआयआर मध्ये, आरोपी म्हणून नामांकित काही खाजगी व्यक्तींचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आठ अधिकारी हे रॅकेट चालवीत होते. आरोग्य मंत्रालयातील माहिती, फाइलची छायाचित्रे काढून ती खासगी महाविद्यालयांना पाठविण्यात येत होती. त्यामुळे जेंव्हा पाहणी पथक एखाद्या महाविद्यालयात जात असे, त्यांची माहिती आधीच या महाविद्यालयांच्या अधिकाऱ्यांना मिळत असे. त्यानुसार, या महाविद्यालयातील अधिकारी बोगस रुग्ण, बोगस कर्मचारी तिथे दाखवत असत. हे केल्यामुळे या महाविद्यालयांना त्यांच्या कामांना परवानगी मिळणे सुसह्य ठरत होते. या माहितीच्या मोबदल्यात मंत्रालयातील तसेच नॅशनल मेडिकल कमिशनमधील उच्चाधिकाऱ्यांना लाखो रुपयांची लाच मिळत असे.

दरम्यान या प्रकरणात ३६ आरोपी असून, केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे(टीस) कुलपती डी.पी.सिंग हेही आरोपी आहेत. या प्रकरणात सर्वप्रथम सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. ईडीने आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!