ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना लॉटरी, नोव्हेंबर -डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, मिळणार 3000?

पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी लाडक्या बहिणींना ई -केवायसी करणं बंधनकारक करण्यात आल आहे. नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जर या निवडणूकांनंतर पैसे येणार असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. तुमच्या केवायसीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत तुम्ही केवायसी करु शकतात. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला त्यानंतरचे १५०० रुपये मिळणार नाहीत. अजूनपर्यंत १ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी महिलांचे केवायसी करणे बाकी आहे.
दरम्यान यामध्ये ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही अशा महिलांचाही समावेश आहे. त्यांच्यासाठी आता नवीन केवायसी प्रोसेस सुरु केली आहे. त्यामुळे आता त्यांची केवायसी होईपर्यंत वेळ लागेल. या कारणांमुळे केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
