पुण्यातील 62 वर्षीय महिलेला चोरट्यानीं घातला गंडा ; ईडीच खोटं पत्र अन अर्थमंत्र्यांच्या नावानं वॉरंट….

पुणे : पुण्यातील एका ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेला ईडीच खोटं पत्र आणि डिजिटल अरेस्टचा बहाणा करून तब्बल 99 लाख रुपयाला चोरट्यानीं गंडा घातला आहे. चोरट्यानीं त्या महिलेला ईडीच पत्र आणि अर्थमंत्र्यांचे वॉरंट सांगून फसवल असल्याची धकादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील 62 वर्षीय ज्येष्ठ महिलेला एक फोन आला. त्यावर त्यांना त्यांचे आधार कार्ड लिंक असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी जॉर्ज मॅथ्यू तुमच्याशी बोलतील असं सांगण्यात आलं.काही वेळातच त्यांना आणखी एका नंबर वरून फोन आला आणि तुमच्यावर तब्बल २० गुन्हे दाखल आहेत अशी खोटी माहिती सांगितली.तसेच तुमच्यावर मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल असून तुमच्या विरोधात ईडीने पत्र काढलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वॉरंट काढलं आहे असं तोंडी सांगितलं. काही दिवसांनी परत पीडित ज्येष्ठ महिलेला फोन करण्यात आला आणि तिथून त्यांच्यावर डिजिटल अरेस्टचे जाळे टाकण्यात आले. तुमचं खातं मनी लाँड्रिंग मध्ये असल्याचं भासवत त्यांना भीती दाखवण्यात आली.सायबर चोरट्यांनी एक व्हिडिओ कॉल वर त्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती मागवली आणि त्यातून पैसे काढण्यास सुरुवात केली.

दरम्यान त्या ज्येष्ठ महिलेला वेळोवेळी त्यांच्या खात्यातून पैसे काढल्यावर आपली फसवणूक झाली असे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीसात धाव घेतली. व त्याविरुद्ध तक्रार केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

