हॉटेलबाहेर आढळला अर्धवट कापलेला पाय; मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना दिसला अन्…, इंदापूर येथे घडली धक्कादायक घटना


इंदापूर : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

अशातच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलपासून ५०० ते ७०० मीटर अंतरावर एका पुरूषाच्या कापलेला डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला आहे.

इंदापूर तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत कळंब नीमसाखर रोडवर ही घटना घडली आहे. बुधवारी सकाळी लोकांना अर्धा कापलेला पाय आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळी दाखल झाले.

       

सध्या अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायाचा भाग एका पुरूषाचा आहे आणि तो डावा तुटलेला पाय आहे. पाय रस्त्यावर पडलेला आढळला. पोलीस आता या घटनेचा सखोल तपास करत आहेत आणि रस्त्यावर पडलेला तो पायाचा भाग कोणाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की बुधवारी सकाळी एका हॉटेलच्या बाहेर, थोड्या अंतरावर, अर्धा कापलेला पाय आढळला. पायात मोजे देखील घातले होते. पायाची ओळख अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

लवकरच माहिती समोर येईल. स्थानिकांनी सांगितले की, सकाळी लोक फिरायला बाहेर पडले होते तेव्हा त्यांना हॉटेलच्या बाहेर एक तुटलेला पाय दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पायात मोजे घातले होते.

दरम्यान, डाव्या बाजूच्या पायाचा गुडघ्यापासून खालील हा भाग असून तो वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!