धक्कादायक! अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन अधिकारीचा थाट ; कल्याण रेल्वे स्थानकावर बनावट अधिकारी म्हणून वावरायचा…


मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश घालून गेल्या काही महिन्यापासून तोतया तरुण फिरत होता. या तोतया युवकाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. लग्न जमवण्यासाठी आणि पोलिस बनण्याच्या नादात त्याने आरपीएफचा गणवेश परिधान केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाश जाधव (रा. भूम, जि. धाराशिव) असे या तरुणाचे नाव असून पोलिस बनण्याची क्रेझ आणि लग्न जमवण्यासाठी केलेले कृत्य त्याला भलतेच महागात पडले आहे.अविनाश जाधव हा शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. पोलिस विभागात कार्यरत असलेल्या मित्रमंडळींमुळे त्याला पोलिस बनण्याची प्रचंड आवड निर्माण झाली होती. मात्र चांगली नोकरी न मिळाल्याने लग्न जमत नसल्याने त्याने आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश विकत घेऊन स्वतःला आरपीएफ जवान असल्याचे सांगणे सुरू केले.गेल्या चार महिन्यांपासून अविनाश रेल्वेतून प्रवास करत, स्वतःला आरपीएफ अधिकारी म्हणून सादर करत होता. इतकेच नव्हे तर आपल्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांनाही तो आरपीएफमध्ये भरती झालो असे सांगत होता. दरम्यान दुपारी कल्याण रेल्वे स्थानकावर अविनाश आरपीएफच्या गणवेशात फिरत असताना खरे आरपीएफ अधिकारी रामेशसिंग यादव यांना त्याच्या बोलण्यावर आणि युनिफॉर्मवर संशय आल्याने त्यांनी ओळखपत्र विचारले. मात्र अविनाशकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. चौकशीत तो तोतया असल्याचे स्पष्ट झाले आणि यादव यांनी तातडीने कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गेल्या काही महिन्यांपासून आरपीएफ अधिकारी असल्याचे भासवून रेल्वे स्टेशन आणि गाड्यांमध्ये मुक्तपणे वावरत असल्याचे उघड झाले. या दरम्यान त्याने कोणाची फसवणूक केली आहे का, याचा पुढील तपास सुरू आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!