शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना पंतप्रधानांच्या स्वागताची बहुमान !पंतप्रधानांच्या स्वागताचा मान हा जीवनातील अविस्मरणीय प्रसंग ….

उरुळी कांचन : संपूर्ण जगात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र,मोदी यांचे मुख्य आकर्षण बनले आहे. जगातील सर्वात लोकप्रिय,व्यक्तीमत्व म्हणून ते गेली दशकभर प्रसिद्ध आहेत.अशात या बहुआयामी उर्जावान नेतृत्वाचे स्वागत करण्याची संधी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिळाली आहे.प्रत्येक जगभरातील भारतवासीयांना लोकप्रियतेने मोहितकरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई स्थित दौऱ्यासाठी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाच्या आ. माऊली कटके यांना विमानतळावर स्वागत करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या स्वागत सोहळ्याने भारावलेल्या आ. माऊली कटके यांनी पंतप्रधानांच्या सन्मानाने उत्साह, अपेक्षा आणि अभिमानाचे तरंग पसरल्याचे तसेच भारतीय संस्कृतीनुसार ‘नमस्कार’ करून स्वागत केल्याने अभिमान वाटल्याचा अनुभव विशद केला आहे.

विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वागतासाठी सुरक्षा यंत्रणांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासूनच परिसरात पोलीस, विशेष संरक्षण पथक (SPG), तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची तातडीची तयारी सुरू होती. विमानतळावर स्वागतासाठी निवडक मान्यवरांना परवानगी देण्यात आली होती असाही भारावलेला अनुभव त्यांनी शेअर केला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे सहकारी आमदार हिरामण खोसकर , राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार , तसेच राज्याच्या पोलीस महासंचालक सौ. रश्मी शुक्ला उपस्थित होत्या.

“देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे आज जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढवणारे नेतृत्व आहे. देशाच्या प्रगतीचा मार्ग ठरविणाऱ्या या महामानवांचे स्वागत करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या प्रेरणेने शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातही विकासाचा वेग अधिक वाढविण्याचा माझा प्रयत्न राहील.”

     
   
तसेच त्यांनी पुढे नमूद केले की,“पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात शेती, उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडत आहेत. केंद्र व राज्य सरकार एकत्र येऊन महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत. शिरूर-हवेली मतदारसंघासाठीही अनेक योजना प्रगतीपथावर असून, त्यातून ग्रामीण भागाचा विकास आणि तरुणांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.”
या प्रसंगानंतर आमदार माऊली आबा कटके यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित सर्व अधिकारी आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “अशा प्रसंगी शिरूर-हवेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी केवळ जबाबदारी नसून जनतेच्या विश्वासाचा सन्मान आहे. हा क्षण माझ्या राजकीय प्रवासातील अविस्मरणीय आणि गौरवशाली ठरणार आहे.
– ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके (आमदार -शिरुर -हवेली )
 
				
