धक्कादायक! मुंबईच्या ऍक्टिंग स्टुडिओत 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवलं; अखेर ‘त्या’ तरुणास अटक


मुंबई : मुंबईच्या पवईत आर. ए. स्टुडिओमध्ये अभिनयाच्या ऑडिशनसाठी आलेल्या १५ ते २० मुलांना दिवसाढवळ्या ओलीस ठेवण्यात आल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याप्रकरणी रोहित आर्य नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,मुंबईच्या पवई येथील आर. ए. स्टुडियो परिसरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग चालतात. सकाळी जवळपास १०० मुलं ऑडिशन देण्यासाठी आली होती. त्याचवेळी स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या आणि यूट्यूब चालवणाऱ्या रोहितनं १५ ते २० जणांना ओलीस ठेवलं. रोहितला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुलांच्या पालकांसह स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दरम्यान ऑडिशनसाठी मुलांना ओलीस ठेवणारा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तो मुलांच्या ऑडिशन घेत होता. आज त्यानं १०० मुलांना ऑडिशनला बोलावलं होतं. त्यातून ८० जणांना त्यानं परत पाठवलं. मात्र बाकीच्या मुलांना एका खोलीत डांबून ठेवलं. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!