आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच PM Kisan चा हप्ता मिळणार, केंद्र सरकारकडून नियम जाहीर, जाणून घ्या….


नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

तसेच केंद्र सरकारकडून राज्यांना सर्व आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, पात्र शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत यासाठी तयारी सुरु आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली.

दरम्यान, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2,000 रु) डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या देशभरात १० कोटींपेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

       

मिळालेल्या माहिती नुसार, २१ वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला दिवाळीपूर्वी पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र आता असे मानले जाते की बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी (6 नोव्हेंबरपासून सुरू) हप्ता वितरित होईल. तरीही, केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख अद्याप घोषित केलेली नाही.

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच २,००० रुपये जमा केले जातील. त्यांनी सर्व राज्यांना ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन नोंदींची पडताळणी त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी अपूर्ण आहेत, त्यांनाही लवकरच लाभ मिळू शकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही…

ई-केवायसी पूर्ण नाही, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही
बँक खात्याचे तपशील चुकीचे किंवा अपूर्ण आहेत
राज्य सरकारांना पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून यादी केंद्राला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जर तुमचे ई-केवायसी आधार लिंकिंग किंवा बँक खाते तपशील अद्ययावत नसतील, तर ते तात्काळ पूर्ण करा. यामुळे तुम्हाला 21 व्या हप्त्याचा लाभ वेळेवर मिळेल. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत पाठवण्याची पूर्ण तयारी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!