गौतमी पाटीलला तृप्ती देसाईंचा पाठिंबा! म्हणाल्या ‘सर्वसामान्य घरातून आलेली…’
पुणे : आपल्या नृत्य अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ हा सूर सध्या सर्वत्रच ऐकू येत आहे. गौतमीच्या डान्स करण्याच्या पध्दतीवरून नेहमी तिच्यावर टीका केली जाते.
याचदरम्यान, काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि रघुवीर खेडकर यांनी जहाल शब्दात गौतमी पाटीलवर टीका केली होती. या टिकेनंतर आता गौतमी पाटीलच्या मदतीसाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई समोर आल्या आहेत.
याआधी देखील जेव्हा कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी, गौतमी पाटीलवर टीका केली होती व तिच्या विरोधात भूमिका घेतली होती. तेव्हा तृप्ती देसाई गौतमी पाटीलला पाठिंबा देण्यासाठी पुढं आल्या होत्या. आता देखील त्या गौतमी पाटीलसोबत खंबीरपणे उभ्या आहेत.
गौतमी पाटील ही सामान्य घरातून आलेली मुलगी असून तिला पाठिंबा देणे गरजेचे आहे. असे तृप्ती देसाई यांचे म्हणणे आहे. कुठलीही पार्श्वभूमी नसताना, अतिशय गरीब परिस्थितीत गौतमी पाटीलने यश मिळवले आहे. त्यामुळे तिची मदत करायला हवी. अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी मांडली आहे.