पुण्यात अपघाताचा थरार ; ट्रक चालकानं तीन वाहनांना जोरदार धडकलं, 2 जण किरकोळ जखमी…


पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उत्तर प्रदेश येथील ट्रकचालक तौफिक इसरार अहमद याला ताब्यात घेतले आहे.या अपघातात एकूण तीन वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात फरशा घेऊन ट्रक कात्रज चौकाकडून नवले पुलाच्या दिशेनं जात असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. या ट्रकने तीन वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले. या भीषण अपघातात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. तपास करून पोलिसांनी ट्रकचालक आरोपी तौफिक इसरार अहमदला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान या घटनेचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!