सोन्याचे दागिने विकायचेत? तर जाणून घ्या कर नियमाची महत्त्वाची माहिती….

पुणे : धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. कोणत्याही शुभ घडीला आपण अगदी गुंजभर नसल तरी सोन्याचं किंवा चांदीचा एखाद नाण तरी विकत घेतोचं. या सोन्याच्या भावाने सध्या आभाळ गाठलं आहे.मात्र याच सोन्याच्या प्रत्येक प्रकारावर कराचे नियम वेगळे असतात आणि चुकीच्या निवडीमुळे तुम्हाला नंतर मोठा कर भरणा लागू शकतो. त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीचे काही प्रमुख मार्ग जाणून घेऊया.

१. सोन्याचे दागिने आणि नाणी- संपूर्ण पारंपरिक पद्धत म्हणजे सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करणं.
कराचा परिणाम: जर तुम्ही २४ ते ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत विकले, तर अल्पकालीन नफ्यावर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर लागतो.

दीर्घकालीन गुंतवणूक: २४ महिन्यांपेक्षा जास्त ठेवली तर LTCG कर १२.५% आहे, पण यामध्ये इंडेक्सेशनचा लाभ नाही, म्हणजे महागाईनुसार समायोजन होत नाही.

इतर खर्च: मेकिंग चार्जेस, स्टोरेज खर्च आणि इतर प्रशासनिक खर्च देखील यामध्ये जोडले जातात.साध्या भाषेत, तुम्ही दागिने खरेदी करून सुरक्षितता मिळवू शकता, पण कर बचत कमी मिळते आणि अल्पकालीन विक्री केल्यास कर भरणा जास्त असतो.
२. गोल्ड ईटीएफ
गोल्ड ईटीएफ म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार केलेले सोन्याचे युनिट्स, जे सोन्याच्या किंमतीचा मागोवा घेतात. या गुंतवणुकीचे फायदे बघितले तर यामध्ये सोन्याच्या किंमतीशी लिंक्ड परतावा मिळतो.तसेच बाजारात सहज खरेदी-विक्री करता येतो व अल्पकालीन विक्रीवरही 12.5% टॅक्स लागू.
होल्डिंग कालावधी: १२ महिन्यांपेक्षा जास्त ठेवले तर LTCG लागू होतो.नुकसान भरून काढणे म्हणजे जर बाजारात तोटा झाला, तर तुम्ही तोटा भविष्यातील नफ्याशी सेट-ऑफ करू शकता. दीर्घकालीन नुकसान ८ वर्षांपर्यंत पुढे नेले जाऊ शकते.सोप्या शब्दात, गोल्ड ईटीएफ हे सुलभ, सुरक्षित आणि काही प्रमाणात कर-कमीट उपाय आहे.
३. SGB
सार्वभौम सुवर्ण बाँड (SGB) हा सर्वात कर-कार्यक्षम पर्याय मानला जातो. हा बॉण्ड RBI कडून चालेल केला जातो व परतावा बघितला तर सोन्याच्या किमतीसह दरवर्षी 2.5% व्याज मिळते.यामध्ये ८ वर्षे, परंतु ५ वर्षांनंतर एक्झिट पर्याय उपलब्ध.यात मॅच्युरिटीवर मिळालेला एकूण परतावा पूर्णपणे करमुक्त आहे. व्याजावर मिळालेला उत्पन्न आयकर स्लॅबनुसार टॅक्स लावला जातो. RBI-backed असल्याने जोखीम नगण्य आहे.म्हणजे, SGB मध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवून दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक करू शकता.
शेवटी, कोणता पर्याय निवडावा?
1-व्यापारी उद्देश किंवा अल्पकालीन गुंतवणूक: गोल्ड ईटीएफ अधिक सोयीस्कर आहे.
2-दीर्घकालीन, कर-कमीट गुंतवणूक: SGB सर्वोत्तम पर्याय आहे.लक्षात ठेवा, सोन्यातील गुंतवणूक फक्त पोर्टफोलिओसाठी नाही तर कर-कार्यक्षम असली पाहिजे, म्हणजे तुम्ही जास्त फायदा मिळवू शकता
जर तुम्ही घरात ठेवलेला सोन्याला विकायला गेला तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. जर तुम्ही सोन्याला तीन वर्षानंतर विक्री केली तर त्यातून होणाऱ्या फायद्याला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स समजल जाते.