आनंदाची बातमी! पुणे ते नांदेडदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावणार, जाणून घ्या कुठे कुठे थांबणार…

पुणे : एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रातील पुणे–नांदेड मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुणे तसेच नांदेडमधील रहिवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

तसेच या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. सध्या पुणे–नांदेड प्रवास पूर्ण करण्यास जास्त वेळ लागतो, पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हा ५५० किमीचा प्रवास फक्त ७ तासांत संपणार आहे.

दरम्यान, या गाडीला सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक पावले उचलली आहेत. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून पाठपुरावा केला होता. त्यांच्या भेटीनंतर रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावाची दखल घेतली असून डिसेंबरपर्यंत गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.

वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मराठवाडा आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होईल. ही गाडी नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे थांबे घेईल. प्रवाशांसाठी सुविधा खूप उत्तम आहेत. ट्रेनमध्ये एसी चेअर कार, हाय-स्पीड वाय-फाय, आरामदायी सीट्स आणि प्रगत सुरक्षा व्यवस्था असेल.
