ऐन दिवाळीत नवी मुंबईत अग्नितांडव ; 6 वर्षांच्या मुलीसह 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी


मुंबई : ऐन दिवाळीच्या काळात मुंबई, नवी मुंबईसह अतर शहरांत आगीच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातच कामोठे परिसरातील एका इमारतीत सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने भीषण आग लागली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या आगीत ६ वर्षांच्या चिमुकलीसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कामोठे येथील सेक्टर 36 मध्ये आंबे सहकारी सोसायटीत आग लागली. आग लागल्यानंतर नागरिक इमारतीमधून बाहेर पडेपर्यंत ही आग इतकी वेगाने पसरली की, या आगीत आई आणि मुलगी आतमध्येच अडकून पडल्या. या दोघींना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्तीच प्रयत्न केलं मात्र आग विझवून आतमध्ये जाईपर्यंत या दोघींचा होरपळून मृत्यू झाला.
नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांची नावे वेदिका सुंदर बालकृष्णन (६), कमला हिरालाल जैन (८४), सुंदर बालकृष्णन (४४), पूजा राजन (३९) अशी आहे

आग लागलेल्या आणि वरच्या मजल्यांवरून जवळपास १० ते १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या १० हून अधिक लोकांना तातडीने फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील कामोठे परिसर एका भीषण दुर्घटनेने हादरला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!