मोठी बातमी! नीलेश घायवळच्या घराची पोलिसांकडून झडती, सापडली धक्कादायक वस्तू, लष्कराच्या शस्त्रागारावर डल्ला?पोलिसांना संशय


पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पोलिसांनी घायवळच्या कोथरूडमधील घराची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्या घरात धक्कादायक वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये दोन जिवंत काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या आणि काडतुसे ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा एक लाकडी बॉक्स आढळला आहे. या बॉक्सवर ‘२०१७’ वर्ष आणि ‘५.५६ एमएम’ असा उल्लेख आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खोक्यामध्ये एका वेळी सुमारे ३०० काडतुसे ठेवण्याची क्षमता असते. यामुळे घायवळने भारतीय लष्कराच्या आर्मरी अर्थात शस्त्रागारावर तर डल्ला मारला नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नीलेश घायवळच्या घरात अॅम्युनिशन बॉक्स सापडला आहे. हा बॉक्स सामान्यत: भारतीय लष्कराकडून वापरला जातो. हा बॉक्स घायवळच्या घरात नक्की कुठून आला? यावरून आता विविध संशंय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी हा बॉक्स जप्त केला आहे. हा बॉक्स पुण्याच्या खडकीतील दारूगोळा कारखान्याशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे. या गंभीर प्रकरणी नीलेश घायवळ याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

दरम्यान पोलिसांना अॅम्युनिशन बॉक्स खडकी येथील लष्कराच्या दारूगोळा कारखान्यातील असल्याची शंका आहे. सरकारी मालकीचा हा दारूगोळ्याचा बॉक्स घायवळसारख्या गुंडापर्यंत कसा पोहोचला? या दृष्टीने पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने तपास सुरू केला आहे. या ‘खडकी कनेक्शन’ची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी दारूगोळा कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!