पुण्यात संरक्षण मंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक ; यंत्रणाची उडाली तारांबळ, नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यातील मावळ येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयात आयोजित पदवी प्रदान सोहळ्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी खास उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक निदर्शनास आली,त्यामुळे यंत्रणेची तारांबळ उडाली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती असण्यापूर्वीच तिथे सापाचा शिरकाव झाल्याने यंत्रणा अडचणीत आली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, काल रात्री त्यांचं पुण्यात आगमन झालं. पुण्यातील मावळ येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयात आयोजित पदवी प्रदान सोहळ्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी खास उपस्थिती लावली.
मात्र ते येण्यापूर्वीच साप नेमका मंचासमोर दिसून आल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरू झाली. मात्र, त्यानंतर साप मंचाखाली गेला आहे. मंत्री महोदय मंचावर येण्यापूर्वीच या सापाला सुरक्षितपणे बाजूला करण्याचे मोठे चॅलेंज सध्या सुरक्षा यंत्रणांसमोर होतं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, डीआरडीओ येथे संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होती. नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस एमके-वन ए’ या लढाऊ विमानाच्या उत्पादनाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल, तसंच ओझर मिनी स्मार्ट टाऊनशिपचं उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

