मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांनो लक्ष द्या! १३ वर्षाच्या मुलासोबत घडलं असं काही की…, घटनेने उडाली खळबळ


उत्तर प्रदेश : मोबाईलवर गेम खेळत असताना एका १३ वर्षीय मुलाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच ‘सडन गेमर डेथ’ या नव्या धोक्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक नावाचा १३ वर्षीय मुलगा आपल्या घरी मोबाईलवर लोकप्रिय ‘फ्री फायर’ हा गेम खेळत होता. खेळता खेळता तो अचानक बेडवर झोपला. काही वेळाने त्याची बहीण घरी परतली तेव्हा तिला विवेक बेडवर झोपलेला दिसला आणि त्याच्या मोबाईलवर गेम सुरूच होता.

खेळताना तो झोपी गेला असेल, असे समजून तिने दुर्लक्ष केले. मात्र, बराच वेळ होऊनही विवेकने कोणतीही हालचाल केली नाही, तेव्हा बहिणीला संशय आला. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रतिसाद देत नव्हता.

       

घाबरलेल्या बहिणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

‘सडन गेमर डेथ’ म्हणजे कोणत्याही प्रकारची शारीरिक दुखापत किंवा हिंसाचार न होता, केवळ मोबाईल किंवा संगणकावर गेम खेळत असताना व्यक्तीचा अचानक मृत्यू होणे. जगभरात अशा अनेक घटनांची नोंद झाली आहे.

अमेरिकन लायब्ररी जर्नल आणि यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन वर प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, अशा मृत्यूंचा संबंध ‘इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर’ या मानसिक स्थितीशी जोडण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!