पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; माजी सरपंचाचीच फॉर्च्यूनर चोरली, पोलीस तपास सुरू..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत चालल आहे. अशातच आता कोरेगाव भीमाचे सरपंच यांची फॉर्च्युनर चोरीला गेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,संदीप ढेरंगे असे माजी सरपंचाचे नाव आहे. ते कोरेगाव भीमाचे सरपंच होते. ढेरंगे सरपंच यांच्याकडे फॉर्च्युनर कार होती. मात्र, आज सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांची कार चोरीला गेली. यशराज टॉवर परिसरात, कोरेगाव भीमा–पुणे नगर रोडवर, चोरट्यांनी फॉर्च्युनर वाहनावर डल्ला मारला. तसेच वाहन चोरी करून चोर पुण्याच्या दिशेनं पसार झाले.फॉर्च्युनर वाहन चोरीला गेल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच फॉर्च्युनर वाहन चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.

दरम्यान पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तपासात चोरट्यांनी फॉर्च्युनर वाहन चोरी केली असल्याचं निर्दशनास आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर कोरेगाव भीमा परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

