धक्कादायक! दौंड तालुक्यातील कला केंद्रात दोन गटात कोयत्याने हाणामारी,चौघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : बारामतीमधील दौंडच्या बोरीपार्धी गावच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्रामध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या हल्ल्यात चौघा हल्ले खोरांनी साहिल बापू जाधव या युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्याजवळ माझ्याकडे रागात का पाहत होता? असे असे म्हणत चौघा आरोपींनी साहिल जाधव यांच्यावर लोखंडी कोयत्याने डोक्यात, मानेवर आणि दोन्ही हातावर जीवे मारण्याचे उद्देशाने वार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. हल्लेखोर आणि जखमी दोघेही कला केंद्रात मनोरंजनाला आले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी साहिलवर कोयत्याने वार केले. या घटनेने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.

दरम्यान साहिल बापू जाधव याच्यावर कोयत्याने वार केल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

