पहिल्यांदा तरुणीला लग्नाचे आमिष नंतर चुंबन त्यानंतर जीवे मारण्याची धमकी! लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल….

लोणी काळभोर : तरुणीला जवळच्या नातेवाईकाने लग्नाचे आमिष दाखवून मिठी मारून चुंबन घेतले, तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने फोटो व्हायरल करून कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शब्बीर इब्राहीम अम्मापुरे (वय २२ रा. गल्ली नंबर ९, मांगडेवाडी, सुंदरनगर, कात्रज पुणे) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मे महिन्यापासून ते आजपर्यंत वारंवार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणी व शब्बीर हे दोघे जवळचे नातेवाईक आहेत. पिडीता या लोणी काळभोर परिसरात, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका इमारतीत राहतात. मे महिन्यात शब्बीर पिडीतेच्या घरी आला होता. आपण लग्न करणार आहोत असे म्हटले तर व लगट करुन तिला मिठी मारली.
त्यानंतर जबरदस्तीने चुंबन घेतले. त्यामुळे पिडीता यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली. पिडीतेने त्याला हे योग्य नाही तु चुकीचे करत आहेस असे वेळोवेळी सांगितले. यानंतरही तो जबरदस्तीने चुंबन घ्यायचा. त्यामुळे पिडीतेने आरडा ओरडा केला. त्यावेळी त्यांने तिला तु जर माझ्याशी बोलली नाही तर तुझे इन्स्टाग्राम हॅक करून त्यावर तुझे फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या बापाला व भावाला सोडणार नाही” अशी धमकी दिली तसेच इन्स्टाग्रामवर वेगवेगळे बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर मेसेज करुन घाणेरड्या शिव्या दिल्या.
त्यानंतर पिडीतेचे पर्सनल इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करुन तिच्या वडीलांचा फोटो स्टोरीला ठेवून घाणेरड्या कमेंट व शिवीगाळ करत आहे. तसेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर मोन्याची रांड” अशी स्टोरी ठेवली होती. तसेच पिडीता यांच्या मैत्रिणींना दोघांचे फोटो पाठवले व त्यांना देखील मॅसेज केले आहेत.
तसेच पिडीतेच्या भावाला दुसऱ्या अनोळखी नंबरवरुन फोन करुन तु कुठेही दिसला तरी तुला सोडणार नाही, तुझ्या बापाला पण सोडणार नाही” अशी धमकी दिली.याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शब्बीर अम्मापुरे याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील करत आहेत.