बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून, भारतीय जनता पक्षाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपने आपल्या ७१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
यात अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली असून, एनडीएच्या जागावाटपाचे सूत्रही आधीच निश्चित झाले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना तारापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी 3 कोटी 92 लाख पुरुष आणि 3 कोटी 50 लाख महिला मतदार आहेत. 14 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर 1,200 मतदार असतील.
बिहार विधानसभेसाठी भाजपप्रणित NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला आधीच जाहीर झाला आहे. भाजप आणि नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड (JDU) प्रत्येकी 101 जागा लढणार आहे. तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 29 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाला आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत.
पहिल्या यादीतील भाजप उमेदवारांची नावे..
बेतिया – सौ. रेनू देवी
रक्सौल – श्री प्रमोद कुमार सिन्हा
पिपरा – श्री श्यामबाबू प्रसाद यादव
मधुबन – श्री राणा रंधीर सिंह
मोतिहारी – श्री प्रमोद कुमार
ढाका – श्री पवन जायसवाल
रीगा – श्री बैद्यनाथ प्रसाद
बथनाहा (अनुसूचित जाती) – श्री अनिल कुमार राम
परीहार – सौ. गायत्री देवी
सीतामढी – श्री सुनील कुमार पिंटू
बेनीपट्टी – श्री विनोद नारायण झा
खजौली – श्री अरुण शंकर प्रसाद
बिस्फी – श्री हरीभूषण ठाकुर बचौल
राजनगर (अनुसूचित जाती) – श्री सुजीत पासवान
झंझारपूर – श्री नितीश मिश्रा
छतापूर – श्री नीरज कुमार सिंह बबलू
नरपतगंज – सौ. देवांती यादव
फोर्बेसगंज – श्री विद्यसागर केशरी
सिक्टी – श्री विजय कुमार मंडल
किशनगंज – सौ. स्वीटी सिंह
बनमंखी (अनुसूचित जाती) – श्री कृष्ण कुमार ऋषी
पूर्णिया – श्री विजय कुमार खे़मका
कटिहार – श्री तारकिशोर प्रसाद
प्राणपूर – सौ. निशा सिंह
कोरहा (अनुसूचित जाती) – सौ. कविता देवी
सहरसा – श्री आलोक रंजन झा
गौरा बौराम – श्री सुजीत कुमार सिंह
दरभंगा – श्री संजय सरावगी
केवटी – श्री मुरारी मोहन झा
जाले – श्री जिबेश कुमार मिश्रा
औराई – सौ. रमा निषाद
कुरहनी – श्री केदार प्रसाद गुप्ता
बरुराज – श्री अरुण कुमार सिंह
साहेबगंज – श्री राजू कुमार सिंह
बैkungthpur – श्री मिथिलेश तिवारी
सिवान – श्री मंगळ पांडे
दरौंधा – श्री कर्णजीत सिंह
गोरियाकोठी – श्री देवेशकांत सिंह
तरैया – श्री जनक सिंह
अमनौर – श्री कृष्ण कुमार मंटू
हाजीपूर – श्री अवधेश सिंह
लालगंज – श्री संजय कुमार सिंह
पटेपुर (अनुसूचित जाती) – श्री लखेंद्र कुमार रौशन
मुईद्दीननगर – श्री राजेश कुमार सिंह
बछवारा – श्री सुरेंद्र मेहता
तेघरा – श्री रैनीश कुमार
बेगूसराय – श्री कुंदन कुमार
भागलपूर – श्री रोहित पांडे
बांका – श्री राम नारायण मंडल
कटोरिया (अनुसूचित जमाती) – श्री पूरन लाल टुडू
तारापुर – श्री सम्राट चौधरी
मुंगेर – श्री कुमार प्रणय
लखीसराय – श्री विजय कुमार सिन्हा
बिहार शरीफ – डॉ. सुनील कुमार
दीघा – श्री संजीव चौरेसिया
बँकीपूर – श्री नितीन नबीन
कुंभार – श्री संजय गुप्ता
पटना साहिब – श्री रत्नेश कुशवाहा
दानापूर – श्री रामकृपाल यादव
बिक्रम – श्री सिद्धार्थ सौरव
बरहारा – श्री राघवेन्द्र प्रताप सिंह
आरा – श्री संजय सिंह “टायगर”
तरारी – श्री विशाल प्रशांत
अरवल – श्री मनोज शर्मा
औरंगाबाद – श्री त्रिविक्रम सिंह
गुरुआ – श्री उपेन्द्र डांगी