फडणवीस सरकारचा शिंदेंपाठोपाठ बच्चू कडूंनाही दणका ; मुंबईतील प्रहारची जागा सरकारकडून रद्द


पुणे: गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सरकारकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालातील काही योजनांना ब्रेक लावण्यात आला आहे. या पाठोपाठ आता बच्चू कडूनांही सरकारने मोठा दणका दिला आहे. त्यांचे मुंबईतील प्रहार जनशक्ती पक्षाचे नरिमन पॉइंट येथील कार्यालय रद्द केले आहे.त्यांनी ही जागा रद्द करताना पक्षाला पर्यायी जागा दिलेली नाही. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रहार पक्षाने म्हटले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ऑगस्ट २०२३मध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला नरिमन पॉइंट येथील बरॅक क्रमांक १० येथे जागा देण्यात आली होती. याठिकाणी आधी जनता दल (सेक्यूलर) पक्षाचे कार्यालय होते. बरॅकमधील कक्ष क्रमांक एक आणि दोन मिळून एकूण ९०९ चौ. फूट जागेपैकी तब्बल ७०० चौ. फूट जागा प्रहारला देत फक्त २०० चौ. फूट जागा जनता दलाला ठेवण्यात आली होती. याविरोधात जनता दल पक्षाने न्यायालयात दाद मागितली होती, हा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट आहे. २०२४नंतर महायुतीशी फारकत घेतल्यापासून कडू यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने प्रहारचे कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना प्रहार पक्षाचे कार्यालय काढून टाकण्याचा निर्णय सरकारकडून घेतल्यानंतर बच्चू कडूंना मोठा दणका बसला आहे.सामान्य प्रशासन विभागाने प्रसृत केलेल्या शासन निर्णयानुसार, ही जागा आता पूर्णपणे जनता दलाला देण्यात येणार आहे. प्रहारला राज्य सरकारने पर्यायी जागा दिलेली नाही. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रहार पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!