मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा ; ‘ या ‘जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; ई -केवायसी करण्यासाठी मिळणार मुदतवाढ…..


पुणे : महायुती सरकारकडून मोठ्या दणक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली.या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता नुकताच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला . या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी महिलांना ई- केवायसी करणं बंधनकारक करण्यात आल आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे महिलांना अडचणी येत आहेत. त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेत ई -केवायसीसाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे. तसेच दरवर्षी केवायसी करावी लागणार असेही आदेश आहेत.

लाडक्या बहिणींना सध्या केवायसी करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातल्या त्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यंतरी पूरस्थिती तयार झाली होती आणि याचाही लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला होता.पूरस्थितीमुळे अनेक दिवस लाडक्या बहिणींना केवायसी करता आली नाही. अशातच आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. खरे तर दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणींना सप्टेंबर चा हप्ता देण्यात आला.दरम्यान आता लाडक्या बहिणींना आणखी एक दिवाळी भेट मिळणार आहे. सरकारकडून लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियाबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून समोर आली आहे.

सर्वर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे महिलांना हा प्रॉब्लेम येत आहे. केवायसीसाठी लाभार्थी महिलांना सायबर कॅफे तसेच आपले सेवा केंद्र समोर दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. तरीही काही महिलांची केवायसी होत नाही. त्यामुळे मंत्री महोदयांनी सर्वर व्यवस्थित नसल्याने त्यावर राज्य सरकारकडून काम केले जात असल्याची माहिती दिली आहे. तसेच राज्यातील 29 जिल्ह्यांमधील महिलांना केवायसी साठी मुदतवाढ देण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांना केवायसीसाठी 15 दिवसांची मुदत वाढवून देण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!