पुण्यातील NDA मध्ये 18 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; दरवाजा उघडताच पोलिसांच्या….

पुणे : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, ज्याला NDA म्हणूनही ओळखले जाते, ही भारतीय सशस्त्र सेवांसाठी एक अकादमी आहे जी खडकवासला, पुणे येथे आहे.याच नंदा मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका 18 वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अंतरिक्ष कुमार असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे, अंतरिक्षने आज पहाटे त्याच्या खोलीतील बेडशीटचा वापर करून गळफास घेतला. याचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी एनडीए कॅम्पसमध्ये धाव घेतली. पोलिसांनी सध्या विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती त्याच्या कुटुंबालाही देण्यात आली आहे. अंतरिक्ष मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी होता.

दरम्यान अंतरिक्ष कुमार याने याच वर्षी जुलै महिन्यात एनडीएमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

