पुण्यात ‘या’ मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार, जाणून घ्या महत्वाची माहिती…

पुणे : सध्या वाहतूक मुक्त चाकण कृती समितीने गुरुवारी चाकण ते आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर पायी मोर्चा काढला. यामुळे काही बदल करण्यात आले आहेत. चाकणमधील वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत मोर्चा मार्गावरील वाहतूक इतर ठिकाणी वळवण्यात आली आहे.

यामध्ये आता निगडी वाहतूक विभागातर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे3 आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

यामध्ये बिगरिजनागर पुला ते पीएमआरडीए (PMRDA) कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने एलआयसी (LIC) कॉर्नरमार्गे इच्छित स्थळी जातील, असेही सांगण्यात आले आहे.

तसेच निगडी-प्राधिकरणातील काचघर चौक- भेळ चौक – संभाजी चौक बिगरिजनागर पुलापर्यंतच्या सेवा रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांना मुख्य मार्गाने इच्छितस्थळी जाता येईल. यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करावा.
