पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी? एटीएस आणि पुणे पोलिसांचं सर्च ऑपरेशन, संशयित ताब्यात..

पुणे : विद्येच माहेरघर अशी ओळख असलेले पुणे शहर आता गुन्हेगारी कारणाने नेहमीच चर्चेत येत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात मध्यरात्रीपासून तब्बल 18 ठिकाणी मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन राबवत आहेत. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

पुण्यात दहशतवादी आढळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती. त्यानंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आलं होतं. त्याच भागात आता पुन्हा काही संशयित तपास यंत्रणांच्या नजरेत आले आहेत. या पार्श्वभूमीवरच मध्यरात्रीपासून एटीएस आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केला आहे. या प्रकरणांमध्ये तब्बल 18 संशयितांना ताब्यात घेण्यासाठी निघालेल्या या संयुक्त पथकानीं काही संशयित ताब्यात घेतले आहेत.

महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. मोठी गुप्तता पाळत ही कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे देशातील दहशतवादाचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

