जलजीवनच्या कामामुळे रोडची झाली दयनीय अवस्था, भवानीनगर- कुरवली 36 फटा रोडवर वाहन चालकांचा संताप…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूस भवानीनगर कुरवली रोड 36 फाट्यावर जलजीवनच्या कामामुळे रोड उकरण्यात आला आहे. मात्र पुन्हा तो सुस्थितीत न केल्याने वाहने चालवताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. याठिकाणी अनेक वाहने घसरत असून अपघात होत आहेत. मुलांच्या शाळेची देखील गैरसोय झाली आहे.

यामुळे संबंधित ठेकेदारांनी याकडे लक्ष देऊन हा रोड पूर्वरत करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. सध्या पावसाचे दिवस असून लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना गाड्या घसरत आहेत. या रोडवर जलजीवनच्या कामाची पाईक टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. नंतर मात्र रोड व्यवस्थित न भरल्याने चिखल होऊन याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे.

यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर रोड पूर्वरत करण्याची मागणी केली जात आहे. भवानीनगर सपकळवाडी कुरवली तावशी येथील नागरिकांची याठिकाणी वर्दळ असते. यामुळे मोठे अपघात होण्याआधी रोडचे काम व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

