‘कांतारा चाप्टर 1’ चा दिल्लीतही डंका ; थेट राष्ट्रपती भवनात होणार स्क्रीनिंग


मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाने सध्या संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे.चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही मोठे आकडे पार केले आहेत.पहिल्या तीन दिवसांतच देशांतर्गत १६० कोटी रुपयांचा विक्रम मोडला आहे. याशिवाय, जगभरात चित्रपटाने २३० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. आता या चित्रपटाचे थेट राष्ट्रपती भवनात स्क्रीनिंग होणार आहे.

पहिल्या भागाप्रमाणेच हा ‘कांतारा १’ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे. तिकिटबारीवर जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या नावे आता एक अत्यंत मोठी आणि मानाची उपलब्धी जोडली गेली आहे.या चित्रपटाचे राष्ट्रपती भवनात खास स्क्रीनिंग होणार आहे. यावेळी चित्रपटाचा नायक ऋषभ शेट्टी आणि प्रमुख अभिनेत्री रुक्मिणी वसंत हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. व्यावसायिक स्तरावर प्रचंड यश मिळवलेल्या या चित्रपटासाठी राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रम आयोजित करणे, हे निर्मात्यांसाठी आणि संपूर्ण टीमसाठी अतिशय अभिमानास्पद आहे.

‘कांतारा’प्रमाणेच ‘कांतारा चॅप्टर १’ चीही कहाणी लोकांना खिळवून ठेवणारी असून, ऋषभ शेट्टीचा अभिनय पाहून प्रेक्षक त्याचे चाहते होत आहेत. ही धमाकेदार कामगिरी ऋषभ शेट्टीच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप खास आहे.राष्ट्रपती भवनातील विशेष स्क्रीनिंगमध्ये सहभागी झाल्यानंतर, ऋषभ शेट्टी दिल्लीत एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. यावेळी तो मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि ‘कांतारा १’ च्या यशाबद्दल सविस्तर चर्चा करेल.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!