“मोबाइल चेक करा, कुख्यात गुंड निलेश घायवळचा दादांना कितीवेळा…”, रवींद्र धंगेकरांच्या दाव्याने खळबळ.


पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला. परदेशात जाण्यासाठी त्याने बनावट पासपोर्टचा वापर केल्याचं देखील तपासात समोर आलं आहे. ज्या व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा दिला? त्याच्यामागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी खळबळजनक दावा केला आहे.पुण्यातील कोथरूडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना निलेश घायवळचे निरोप जात असल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या पाटील नावाच्या व्यक्तीचा देखील उल्लेख केला. या पाटील नावाच्या व्यक्तीच्या फोनची तपासणी केली तर निलेश घायवळबाबतचे अनेक खुलासे होतील,
घायवळ आणि तो किती वेळा बोलला अन् दादांना (चंद्रकांत पाटील) किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल, असा खळबळजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केला.त्यामुळे या प्रकरणाला आता आणखीन काही नवीन वळण लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, निलेश घायवळ एकटा काहीच करू शकत नाही. पोलिसांनी आज ठरवलं तर घायवळ नेस्तानाबूत होईल. त्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, त्याला शोधणे गरजेचे आहे, त्यांचा तपास करणं गरजेचे आहे, असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!