मोठी बातमी! शरद पवारांचे आमदार बापूसाहेब पठारे यांना लोहगावमध्ये मारहाण ; राजकीय वातावरण तापलं


पुणे: पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना शनिवारी लोहगाव परिसरात झालेल्या कार्यक्रमादरम्यान मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथे शनिवारी संध्याकाळी एका स्थानिक कार्यक्रमादरम्यान आमदार पठारे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला. काही वेळात या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे.या घटनेमुळे कार्यक्रमात गोंधळ उडाल्याने पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान आमदार पठारेच्या समर्थकांना ही माहिती मिळताच त्यांचे समर्थक तसेच खांदवेंचे समर्थक देखील आले. त्यामुळे परिसरात आणखी वाद वाढला. वातावरण चिघळु नये म्हणून उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना परिस्थिती हाताळण्यासाठी फोनवरून आदेश दिले. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. रात्री उशिरापर्यंत विमानतळ पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!