उरुळीकांचनमध्ये टॅंकर थेट दुकानात शिरला ! विचित्र अपघातात चारचाकी , दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान …!

उरुळी कांचन : चालकाला दुभाजकावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने झालेल्या चार ते पाच वाहने एकमेकांना विचित्र स्वरूपात धडकून एक टॅंकर थेट एका दुकानात शिरुन मोठे नुकसान केल्याचा प्रकार रविवार ( दि.५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या जवळ चार ये पाच वाहनांचा हा अपघात झाला आहे. यामध्ये एक ऑइल टँकर, 4 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अपघात ग्रस्त टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले व टँकर थेट महामार्गाच्या बाजूला असलेल्या अमर टायर च्या दुकानात घुसला. त्यामुळे दुकान, टँकर, व चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 2 चारचाकी एक टँकर व दुचाकी यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दुकानातील साहित्यांचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान हा अपघात टॅंकर चालकाला नव्याने उभारलेल्या गतिरोधकाचा अंदाज आला नसावा अशी शक्यता असून टॅंकर रस्त्यावर जोरदार आदळून रस्त्याबाहेर फेकला जाऊन मार्गालगतच पंधरा फूटावर आत घुसून दुकानाचे नुकसान झाले आहे.

