लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! या कागदपत्रांशिवाय eKYC अपूर्ण, लागलीच पूर्ण करा प्रक्रिया, नाहीतर थांबणार हप्ता…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

गेल्या वर्षभरात त्यांच्या खात्यात १८ हजारांची रक्कम जमा झाली आहे. या योजनेतंर्गत १५०० रुपये दरमहा पात्र महिलांच्या खात्यात जमा होतात. पण गेल्या काही महिन्यात या योजनेत अनेक घुसखोर घुसल्याचे समोर आले. काही पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले.

तर सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेत हात धुवून घेतल्याचे समोर आले. योजनेला विविध निकष लावण्यात आले आहेत. या योजनेला लागलेली घुसखोरीची कीड दूर करण्यासाठी आता ई-केवायसीची सक्ती करण्यात आली आहे. ई-केवायसीसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहे, हे समजून घ्या…

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील कागदपत्रं असणं गरजेचे आहे..
आधार कार्ड
पासरपोर्ट साईज फोटो
रहिवाशी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र
उत्पन्नाचा दाखला
बँक खात्याची सविस्तर माहिती
नमूद केलेली इतर कागदपत्रं
eKYC करण्याची प्रक्रिया
सरकारचे या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in आहे. यावर अथवा ई महासेवा केंद्रावर महिलांना ईकेवायसी पूर्ण करता येणार
अशी करा प्रक्रिया पूर्ण
साईटवर जा. ई-केवायसीवर क्लिक करा
नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक नोंदवा
मागितलेली कागदपत्रं अपलोड करा. सबमिट करा. त्यानंतर कागदपत्रं जमा झाल्याची खात्री करा
