उपमुख्यमंत्री अजित पवारांची पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती ; आजचे सगळे कार्यक्रमही रद्द, कारण काय?


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती लावण्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच आता त्यांनी आजचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अजित पवार आजारी असल्यामुळे बाहेरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. अजित पवारांनी काल, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजेरी लावली होती. त्यानंतर रात्रीच्या पक्षाच्या बैठकीला अजित पवार अनुपस्थित होते.ही बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पक्षाच्या आगामी रणनीती, संघटनात्मक बदल आणि स्थानिक निवडणुकांची तयारी यावर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे कुर्डू येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणातील त्यांच्या सहभागामुळे अजित पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणात एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांशी झालेला वादाचाही उल्लेख आहे. त्यानंतर आता त्यांच्या बैठकीतील अनुपस्थितीने चर्चेला उधाण आला आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!