उद्या लाँच होणार iPhone 17, किंमत आणि फीचर्स वाचून थक्क व्हाल, जाणून घ्या…


नवी दिल्ली : जगभरातील टेकप्रेमींना ज्याची आतुरतेने वाट आहे, तो ॲपलचा वार्षिक “Awe Dropping” इव्हेंट उद्या (९ सप्टेंबर) भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता रंगणार आहे. या भव्य कार्यक्रमात कंपनी आपली नवी iPhone 17 सीरिज सादर करणार आहे.

वेळी फोनमध्ये आणखी स्लिम डिझाइन, एआयवर आधारित नवे फीचर्स आणि अधिक ऍडव्हान्स कॅमेरा सिस्टीम असण्याची चर्चा आहे. यासोबतच नवीन Apple Watch, AirPods Pro 3 आणि काही हार्डवेअर अपडेट्सही जाहीर होऊ शकतात.

भारतातील ग्राहकांचे लक्ष प्रामुख्याने किंमतीवर खिळले आहे. अहवालानुसार, iPhone 17 च्या बेस मॉडेलची किंमत साधारण ₹८६,००० असू शकते. गेल्या वर्षीचा iPhone 16 बेस मॉडेल ₹७९,९०० ला उपलब्ध होता. म्हणजेच सुमारे ₹६,००० ने किंमत जास्त होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, iPhone ची किंमत वाढ USD-INR विनिमय दराशी थेट संबंधित आहे. गेल्या काही वर्षांत आयफोनच्या किंमती दरवर्षी सरासरी ७.६% ने वाढल्या, तर रुपया डॉलरच्या तुलनेत जवळपास ५.२% ने घसरला. प्रत्यक्ष महागाईचा विचार करता किंमतवाढ दरवर्षी सुमारे २.४% इतकी आहे.

ॲपलने भारतात iPhone 17 चे असेंब्ली उत्पादन सुरू केले असले तरी, प्रोसेसर, कॅमेरे आणि डिस्प्ले यांसारखे महत्त्वाचे पार्ट्स आयात करावे लागतात. त्यामुळे परकीय चलनातील बदलांचा परिणाम अंतिम किंमतीवर होणारच. स्थानिक उत्पादनामुळे सप्लाय चेन सुधारेल, पण ग्राहकांना किंमतीत मोठा दिलासा मिळणे कठीण दिसते.

मिळालेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये भारतात ॲपलचे शिपमेंट १.५ कोटी युनिट्स पर्यंत जाऊ शकते. यामुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात ॲपलचा हिस्सा १२-१५% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, जो दशकभरापूर्वी केवळ १-१.५% होता. आता ग्राहकांचे लक्ष उद्याच्या इव्हेंटकडे लागले आहे. ॲपल iPhone 17 बेस मॉडेलसाठी खरोखरच ₹८६,००० किंमत जाहीर करते का, की भारतीय ग्राहकांसाठी वेगळी रणनीती आणते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!