सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलन वेगळ्या वळणावर, आझाद मैदान तीन वाजेपर्यंत रिकामे करा, उच्च न्यायालयाच्या सूचना…


मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. या घडामोडी घडत असतानाच आज या आंदोलनासंदर्भात उच्च न्यायालायात पुन्हा सुनावणी झाली.

आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाही. आज, मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत आंदोलकांना आदेशाचे पालन करायला सांगा, अन्यथा आम्हाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी लागेल आणि मनोज जरांगे पाटील यांना जबर दंड लावण्याचाही आदेश आम्हाला द्यावा लागेल, मुंबईकरांना शांतपणे त्यांचे जनजीवन जगू द्या, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा. सगळं सुरळीत झालं पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला म्हणून कारवाई करू असा इशारा न्यायालयाने दिला. या प्रकरणी दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारच्या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

याच सुनावणीत न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देशच आंदोलकांना दिले आहेत. तसेच, पोलिसांनाही कायद्यानुसार कारवाई करण्याचे बजावले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांची दिसून येत आहे.

केवळ पाच हजार जणांना परवानगी असताना काय काळजी घेतली? असा सवाल मुंबई हाय कोर्ट ने आंदोलकांच्या वकिलांना विचारला. आंदोलकांकडे परवानगी नाही, त्यामुळे दोन वाजून ४० मिनिटांपर्यंत तात्काळ जागा रिकामी करा, आम्हाला तीन वाजेपर्यंत सर्वकाही सुरळीत झालेलं हवं, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन आढावा घेऊ, असं कोर्टाने निक्षून सांगितलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!