मुंबईत, खाऊगल्ली, हॉटेल, पाणपोया बंद, स्वच्छतागृहांनाही लॉक, सरकार मराठा आंदोलकांशी असं का वागतय?


मुंबई : कालपासून मुंबईत मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. असे असताना सरकारकडून मुद्दाम आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत.

काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत.

शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही.

सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल सुरू आहेत. राहायला जागा नसल्याने तसेच पाऊस पडत असल्याने तारांबळ उडाली आहे. यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे असून मराठा समाजाला आरक्षण ही गरज असून लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!