शिंदेंच्या हाताला बडा मोहरा ; ‘या ‘ नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे राजू शेट्टींना मोठा धक्का


पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिंदेंच्या सेनेने मोठा डाव टाकत अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठा नेता गळाला लावला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभावी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे सेनेची ताकद आता वाढली आहे.

शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणारे रवींद्र मोरे हे केवळ जिल्हाध्यक्ष नव्हते तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे आक्रमक, आंदोलनशील आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.मोरे यांनी ऊसदर, वीजदर, हमीभाव, दुष्काळी मदत यांसह शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनेक वेळा जिल्ह्यात ठिणगी उडवणारी आंदोलने केली होती. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात ताकद मिळाली होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच मोरे यांनी राजू शेट्टींचा हात सोडत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात जबर धक्का बसला आहे.

दरम्यान मोरे यांच्या प्रवेशावेळीच त्यांना शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. मोरे यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. राजू शेट्टींना मोठ्या धक्क्यामुळे नगर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आता ‘नेतृत्वशून्य’ होण्याच्या स्थितीत आली असून, मोरे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेचा शिंदे गट मात्र जिल्ह्यात अधिक बळकट होणार आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!